मुख्य मजकुराकडे जा
मेघना भुस्कुटे

काहीबाही

८० नोंदी

  • · पॉर्नांक

    तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

    काही गोष्टी जाहीर बोलू नयेत असं आपल्या मनावर लहानपणापासून पद्धतशीरपणे बिंबवण्यात आलेलं असतं. त्यात काहीएक समंजसपणा, जाण असते आयुष्याबद्दलची. काही प्रमाणात प्रस्थापितांचे हितसंबंध असतात. काही थोडी सगळ्यांचीच दीर्घकालीन सोय. एकूण परिणाम असा होतो, की ज्या गोष्टी स्पष्ट आणि स्वच्छ…

  • लकाकी

    मस्त वाटतं, शाईपेनानं लिहायला. लिहिताना कागदावर झुकून एका विशिष्ट कोनातून मजकुराकडे पाहताना, ओल्या शाईमुळे अक्षरांना आलेली देखणी लकाकी दिसत राहते. ती अशक्य सुंदर असते. हळूहळू ओसरत जाते ती. पण ती ओसरत जाताना आपण कुठे थांबून पाहत राहिलेले असतो? आपण पुढच्या अक्षरांना जन्म देत,…

  • माझ्या भाषेवर माझं प्रेमबिम आहेबिहे?

    माझ्या भाषेवर माझं प्रेमबिम आहेबिहे हे वाक्य एकूण पकाऊच. जन्मापासून ज्या गोष्टीला भवतालातली एक म्हणून गृहित धरली, तिच्यावर प्रेम आहे असं एकदम उठून म्हणणं भंपकच. तर प्रेमबिम बाजूला ठेवू या. मला हीच भाषा येते. बस. याच एका भाषेतून मला जोरकस शिव्या देता येतात. भांडण करताना…

  • यंदा

    यंदा मला कुठेतरी मस्त चंपी करून घ्यायला जायचंय. सगळी जुनी कोरडी त्वचा उतरवून टाकायची आहे. गुंजभरही वजन कमी करून न घेता हलकं हलकं, मऊ व्हायचंय. तेच ते संकल्प, त्याच त्या नॉस्टाल्जिक गोष्टी, त्याच त्या चमकदार बेगडी शब्दांच्या जरतारी माळा, तेच ते आउटिंग आणि तेच ते गेट्टुगेद्री…

  • टप्पा

    दर थोड्या वर्षांनी असा एक टप्पा येतो, जेव्हा पुस्तकं, माहिती, माणसं, घटना आणि आपण यांच्यातले संबंध एखाद्या गजबजलेल्या मधमाश्यांच्या पोळ्यासारखे किंवा सकाळी साडेनवाच्या सुमारास वाहणार्‍या दादर स्टेशनमधल्या मिडल ब्रिजसारखे असतात. चहू बाजूंनी अंगावर गोष्टी आदळत असतात. आपण दोन्ही…

  • काय करता! (उर्फ मातृभाषा आणि काही गट)

    मातृभाषेबद्दल आस्था असलेल्या माझ्यासारख्या लोकांना एकाच वेळी अनेक निरनिराळ्या आघाड्यांवर झगडावं लागतं. अ] अतिविशाल गट एकीकडे नवश्रीमंत, मराठीबद्दल तुच्छता/न्यूनगंड बाळगणारे, अर्धवट आंग्लाळलेले, नवश्रीमंत लोक. या गटातले लोक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांत घालतात.…

  • इकडील बाकी सर्व ठीक

    चेहऱ्यावर हसू चिकटवून ठेवणं सोपं असतं. सरावानं, अवयव असावा आपला, अशा सराईतपणे ते मोबाईलसारखं वागवता-वापरताही येतं. माणसांमधे पाय गुंतलेला नसेल, तेव्हा तीही वाचता येतात सहज. आरपार. मग त्यांची कळ समजून, त्यांना न दुखावता, मैत्रीचे हलकेफुलके झुलते पूल बांधून, खेळकर संभाषणं फेकत आणि…

  • हॅपी न्यू इयर

    ब्लॉग या माध्यमप्रकाराकडे छद्मी हसून पाहण्याची सध्याची एक सर्वमान्य पद्धत आहे. व्यक्तिगत अनुभवांचे अर्धकच्चे तपशील, डायरी, प्रेमभंगाचे अभंग, खवासदृश पाडलेल्या कविता, एकांतमैथुनं, लोकसन्मुखतेचं वावडं वगैरे वगैरे लागेबांधे ब्लॉग या गोष्टीला लागूनच येतात, असं एक आहे. तर ते तसं…

  • गेलं वर्ष-दीड वर्षं मी काही वाचलेलं नाही

    गेलं वर्ष-दीड वर्षं मी काही वाचलेलं नाही. तांत्रिक दृष्ट्या हे वाक्य चूकच म्हणायला हवं. कारण पोटापाण्यासाठी करण्याचं माझं काम, आयुष्याचा प्रचंड मोठा भाग व्यापून बसलेली मजकूरप्रधान माध्यमं आणि निवळ सवयीनं चाळली वा ढकलली जाणारी पुस्तकं मोजली तरी बरंच वाचन भरेल. पण एकूणच…

  • टीव्ही: नॉस्टाल्जिया, नौटंकी आणि निरीक्षणं

    मला टीव्ही बघायला जाम म्हणजे जामच आवडत असे. दूरदर्शनचं ते ’टॅऽऽणॅणॅणॅ-टॅणॅणॅऽऽणॅणॅऽऽ’, माना वेळावून मानेचे व्यायाम दाखवणारा दाढीवाला सरदारजी, मूकबधिरांसाठीच्या बातम्या, ’एक चिडिया... अनेक चिडिया’वालं ऍनिमेशन, ’मिले सूर मेरा तुम्हारा’... असं करत करत नाना रस्ते घेता येतील नि शेवटी…