मुख्य मजकुराकडे जा
मेघना भुस्कुटे

काहीबाही

८० नोंदी

  • भकारी शब्दांची भानगड

    हा ‘दिव्य मराठी’च्या मधुरिमा पुरवणीत लिहिलेला लेख. मृण्मयी रानडे यांच्या पाठपुराव्यामुळे लिहिलेला. इथे तो पूर्वप्रकाशित आहे. पण मला लेखावरचं चित्र तितकंसं आवडलं नाहीय. म्हणून इथे स्वतंत्र देते आहे. माझ्या डोक्यात हातात एखादा गुंड्याभाऊ-स्टाइल सोट्या घेतलेला भ या अक्षराचा…

  • राहत्या शहराचे लागेबांधे ५

    भाग १ । भाग २ । भाग ३ । भाग ४ कधीकधी स्वप्नातून धसकून जाग येते आणि जाग आलीय की नाही याचाही धड पत्ता लागत नाही. अशा अर्धजागृतीच्या रेषेवर घुटमळत असताना, उठून शू करायला जायचं असतं खरंतर. पण नक्की कोणत्या दिशेनं गेल्यावर या वास्तूची बाथरूम सापडेल त्याबद्दलही संभ्रम. पोटात…

  • राहत्या शहराचे लागेबांधे ०४

    भाग ०१ । भाग ०२ । भाग ०३ माझा एक म्यानेजर मित्र आहे. पहिल्या नोकरीच्या काळात सगळीकडूनच झिलई चढायची असतानाच्या आणि अंगच्या रानवट उद्धटपणाची कोवळीकही ओसरलेली नसतानाच्या दिवसांपासूनचा. आमच्यात चकमकी झडत बर्‍याच. पण गप्पाही होत कसल्याही आडव्यातिडव्या, तुरळक आणि घनदाट.…

  • राहत्या शहराचे लागेबांधे ०३

    भाग ०१ । भाग ०२ आजोळ म्हणजे हमखास मऊ-रेखीव आणि रम्य असलंच पाहिजेत असा एक अलिखित नियम आहे. मी मात्र निर्णयस्वातंत्र्य येताक्षणी ते गोंधळवणारे प्रवास हाणून पाडायला सुरुवात केली, त्यामागे फार काही मेलोड्रॅमेटिक दुःखी कारणं होती असं नव्हे. ज्या गोष्टींनी फार भारून जाण्याची,…

  • राहत्या शहराचे लागेबांधे ०२

    भाग ०१ माझा त्या गावावर तसा राग नाही. पण लोभही नाहीच. त्याच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि भाषिक महिरपी मला अजिबात बिचवकत नाहीत. बिचकवणारही कशा म्हणा - मी गावात शिरते, तीच मुळी त्यानं वेशीच्या पल्याड नवश्रीमंत उठवळपणानं पसरलेले हातपाय निरखत. माझ्यापाशी माझ्या माहेरच्या…

  • आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने...

    इन्टरनेट, फेसबुक, स्मार्ट फोन्स या त्रयीनं मराठी सारस्वतात काही महत्त्वाचे बदल घडवले. त्या बदलांचा वेध घेणारी लेखमाला 'दिव्य मराठी'मध्ये लिहिली. तिचे चारही लेखांक इथे एकत्रित स्वरूपात देत आहे. ते लिहितानाच लक्ष्यात येत गेलं की ही शब्दमर्यादा या विषयाला आक्रसवते आहे. याहून…

  • राहत्या शहराचे लागेबांधे ०१

    वास्तव्याच्या ठिकाणांशी, शहरांशी, रस्त्यांशी आणि सार्वजनिक जागांशी.. आपले लागेबांधे जोडले जातात. आपल्या वरकरणी विनाकारण बदलत्या मूड्सवर त्यांची छाया असते. ते छायाप्रकाश पकडण्याचा हा प्रयत्न. एरवी लोकल ट्रेनमध्ये बसल्यावर खूश व्हायला व्हावं अशा अनेकच गोष्टी असतात. पण जर…

  • मला प्रवास आवडत नाहीत... कंटिन्यूड.

    एका प्रकल्पासाठी काही ‍अ‍ॅडिशनल तुकडे खरडले होते. पण प्रकल्प लांबला म्हणताना प्रकाशित करते आहे. मूळची पोस्ट इथे सापडेल. हे त्याचं निव्वळ वाढीव शेपूट आहे. काही जोडमित्रांबरोबरचा एक प्रवास. जिज्ञासूंसाठी, जोडमित्र म्हणजे - ज्या जोडीतल्या दोन्ही व्यक्ती आपले पहिल्या धारेचे…

  • मला प्रवास आवडत नाहीत

    मला प्रवास आवडत नाहीत. मुक्कामी गावाच्या स्वभावापासून ते सहप्रवाशांच्या अकलेपर्यंत सगळंच, गाड्यांचे गोंधळ असताना तासाभरानं आलेल्या लोकलच्या दिशेनं सूर मारावा तसं. डेरिंगबाज, पण यश अनिश्चित. अनेक प्रवास माझ्या झोळीत चरफडीखेरीज आणि आगामी जहरी पूर्वग्रहांखेरीज काहीही बांधून देत…

  • हेही दिवस सरतात

    कविता म्हणजे काय करतो आपण?

    आता कवितेनं पाठ फिरवल्यावर सोडवायचे हे प्रश्न. उन्हाळ्याच्या सुट्टीत पाढे लिहिल्यासारखे.

    पण पाढे मला तितके काही नावडत नाहीत, नाहीतच. दाहोदरसे, तिहोत्रीदोन, चाळासे, त्रेसड्डासे… वगैरे प्रकरणं तेव्हा न समजता पाठ करून टाकली; तरी चिंचेबरोबर उगाच जिभेवर खडेमिठाचा धारदार खडा घोळवत राहावा आणि जीभ चरचरली तरी मजेशीरच वाटत राहावं, तशी त्यातली गंमत मला अजूनही आवडते. समोरचा माणूस कॅल्सी हुडकेस्तोवर आपण आकडा सांगूनही टाकतो. मग तो आपल्याला चक्क भ्यायला लागला आहे, हे लक्ष्यात येतं आणि तरी आपण निर्विकारपणाचं बेमालूम सोंग काढतो; तेव्हा मला अजूनच मजा येते.

    होय, थोडी दुष्ट आहे खरी मी. असो. तर - कविता म्हणजे काय करतो आपण?

    या प्रश्नाची उत्तरं कवीगणिक निरनिराळी (आणि कवित्वाच्या निरनिराळ्या तरतमपातळ्यांवरची) असणार आहेत हे कबूल करून टाकलं, तरीही आपली निराळी उत्तरं उरतातच. ती तरी कधी परजायची? तर आत्ताच. उन्हाळ्याच्या दिवसांत.

    …