मुख्य मजकुराकडे जा
मेघना भुस्कुटे

काहीबाही

८० नोंदी

  • सूरजको मैं निगल गया....

    खालच्या या जुन्या पोस्टनंतरही बरंच पाणी पुलाखालून वाहून गेलं आहे. पण कृतज्ञता आहे तशीच. तुझ्यासोबत एक आख्खं युग बघायला मिळाल्याबद्दल. बाकी प्रश्नोत्तरं होत राहतील. शंकाकुशंका, आरोपप्रत्यारोप, आकडेवारी आणि भूमिकांचं विच्छेदन... होवो. तूर्तास फक्त एक कृतज्ञ सलाम. मजा आणलीस यार,…

  • गोल सेटिंग आणि अप्रेझल वगैरे...

    डिस्क्लेमरः अ) कोणत्याही अर्थाने ही साहित्यकृती नाही. डोक्यातला गोंधळ दूर करण्याचा प्रयत्न आहे. लिहिताना गोष्टी अधिक स्पष्ट दिसतात, एका विशिष्ट क्रमानी-काही कप्पे करून मांडता येतात, त्यातून काहीएक उत्तर मिळण्याची आशा निर्माण होते, म्हणून. आपापल्या जबाबदारीवर वाचणे. आ) 'आयुष्याचा…

  • पांढर्‍यावर काळं

    या नोंदीला तसा काही अर्थ नाही. पण अगदीच निर्मनुष्य शांततेला छेद द्यायचं ठरवलंय मी - कसल्याही स्पष्टीकरणाशिवाय. म्हणून हे पांढर्‍यावर काळं. आपापल्या जबाबदारीवर... इत्यादी. --- वेगवान, सनसनाटी, धरून ठेवणार्‍या - पण परभाषक - पुस्तकात बुडून गेले असताना एकदम साक्षात्कार झाला: आपण…

  • कशासाठी? पोटासाठी

    जादूचा दिवा हरवून किंवा झिजून गेल्यानंतरच्या सर्वसामान्य अल्लाउद्दिनची गोष्ट ऐकलीय कुणी कधी? किंवा वंडरलॅंडचा पत्ता विसरून गेलेल्या; पोरंबाळं आणि त्यांचे होमवर्क्स, विजबिलं-किराणा, क्रेडिड-कार्डाची बिलं या लबेद्यात गुरफटलेल्या ऍलिसची? किंवा मगलवर्ल्डमधे अडकून पडलेल्या आणि…

  • निरर्थक

    कधी कधी असं वाटतं, की सगळ्याच गोष्टींची पुनरावृत्ती होते आहे. हातातून वाळू निसटत जावी, तशी आपली माणसं आपल्या आयुष्यातून निसटून जाताहेत. आणि आपण हताशपणे निव्वळ उभे आहोत. हा असा भूतकाळाशी सतत तुलना करण्याचा चाळा निरर्थक आणि काही अंशी मनोरुग्णतेचं द्योतकच, हे मान्य आहे. तरीही…

  • ...

    दर दिवशी नवी निवड. नवीन पर्याय. नवीन प्रश्न. त्यांतून रोज नवे होत गेलेले आपण. आणि रोज बदलत जाणार्‍या आपल्या नोंदी ठेवणारेही आपण. काय दिसतं त्यातून? वर-खाली, मागे-पुढे, ठळक-पुसट, नव्या-जुन्या, जोरकस-नाजूक रेषांच्या खुणा. दर दिवशी नवीन चित्र? आणि मग? बदलत गेलेले आणि तरीही पुन्हा…

  • इन्सेक्युअर्ड

    खूप जिवाजवळच्या माणसांबद्दल आपण मोकळेपणानं आणि तटस्थपणे बोलूच शकत नाही, तसंच काहीसं पुस्तकांबद्दल वाटायचं . अजूनही वाटतं. पण आपल्यातले काही भाग आपल्यातून सोडवून हे असे तळहातावर निरखायला घेतले, म्हणजे मग त्यांच्या निराळ्याच बाजू दिसायला लागतात. आपल्याही. --- तर पुस्तकं. मला काय…

  • मॉर्निंग, वॉक आणि मी

    शुक्रवार रात्री नऊसाडेनऊ: उद्या (तरी) सकाळी उठून फिरायला जायचंच, मी कितव्यांदातरी निग्रहानं स्वत:शी घोकते. नेहमीप्रमाणे साडेपाच वगैरे वाजताचा अघोरी गजर लावते. मग एकदम पापमुक्त झाल्यासारखं वाटून लोळत टीव्ही. मग काही वेळ कादंबरी. झोप येण्यापुरती हातात धरलेलं अभ्यासाचं पुस्तक.…

  • लिहिण्याची सवयच गेलीय

    लिहिण्याची सवयच गेलीय. विश्राम बेडेकरांनी म्हटलं आहे, त्या चालीवर आपण लिहिल्याशिवाय जगू शकतो म्हणजे आपण लेखक नाही. मग हा अट्टाहास कशासाठी? उगाच खुजली म्हणून. पांढर्‍यावर आपल्या नावानं काळं झालेलं दिसलं की गारगार, एकदम सत्ताधीश वाटतं म्हणून. कुणी कुणी 'वा, छान' म्हणतं म्हणून.…

  • नाना परीच्या निकडी । खेळ मांडियेला ॥

    ही जी चिडचिड होते, ती कशामुळे होते? एक मिनिट. या सगळ्या प्रकारात आत्मसमर्थन का काय ते होणार. पण शक्यतोवर ते टाळून थोडं लांब जाऊन पाहायचा प्रयत्न आहे. शक्य तितका प्रामाणिक. तर, ही जी चिडचिड होते, ती कशामुळे होते? आपल्याला हव्या तशा गोष्टी आजूबाजूला नसल्या की चिडचिड होते. हव्या…