ऐकत राहायला हवं
कुणाचं काही ऐकू नयेसं वाटतं. कुणी काही बोलू लागलं तर त्यावर आवाज चढवून आपणच बोलत राहावं वाटतं. नव्हे, तसं केल्यावाचून राहवतच नाही. फक्त आपलाच आवाज ऐकू येत राहतो मोठ्यांदा. नि तरी समाधान होत नाही, तहान शमत नाही, जीव शांतवत नाही. कशानं हे असं? कसला राग येतो? कसले अपमान सलतात?…