मुख्य मजकुराकडे जा
मेघना भुस्कुटे

मला प्रवास आवडत नाहीत

३ भाग, कालानुक्रमाने

  1. मला प्रवास आवडत नाहीत

    मला प्रवास आवडत नाहीत. मुक्कामी गावाच्या स्वभावापासून ते सहप्रवाशांच्या अकलेपर्यंत सगळंच, गाड्यांचे गोंधळ असताना तासाभरानं आलेल्या लोकलच्या दिशेनं सूर मारावा तसं. डेरिंगबाज, पण यश अनिश्चित. अनेक प्रवास माझ्या झोळीत चरफडीखेरीज आणि आगामी जहरी पूर्वग्रहांखेरीज काहीही बांधून देत…

  2. मला प्रवास आवडत नाहीत... कंटिन्यूड.

    एका प्रकल्पासाठी काही ‍अ‍ॅडिशनल तुकडे खरडले होते. पण प्रकल्प लांबला म्हणताना प्रकाशित करते आहे. मूळची पोस्ट इथे सापडेल. हे त्याचं निव्वळ वाढीव शेपूट आहे. काही जोडमित्रांबरोबरचा एक प्रवास. जिज्ञासूंसाठी, जोडमित्र म्हणजे - ज्या जोडीतल्या दोन्ही व्यक्ती आपले पहिल्या धारेचे…

  3. मला प्रवास आवडत नाहीत - ३

    एकीचं शाळेत शिकलेलं फ्रेंच आणि बाकीच्यांचं फ्रेंचचं एकअक्षरकळलतरशपथ-आकलन घेऊन पॅरिसात उतरलो आम्ही, तेव्हा गंतव्य मेट्रो स्टेशन 'इथ्थेच जवळ' आहे हे माहीत होतं. आमची किल्ली घेऊन एअरबीएनबीत साफसफाई करणारी काकू तिष्ठत होती. पण प्रत्यक्ष मेट्रो स्टेशनात पोचेस्तो किमान पाच तरी 'कुठून…