मुख्य मजकुराकडे जा
मेघना भुस्कुटे

खाईन तर तुपाशी...

१८ नोंदी

  • डाळ-पालक, भात नि काकडीची कोशिंबीर

    दिवसाचे दोन सरळसोट तुकडे झालेले. हापिस आणि घर. हापिसातल्या वेळाला एक अलिप्त कोरा-करकरीत वास. नव्या छत्रीवर पहिल्यांदा पाऊस पडला की जसा येतो, तसल्या करकरीत वॉटरप्रूफ पोताचा. अजून फारश्या मैत्र्याही नाही झालेल्या. नुसतंच गोड हसून साजरं करणं. उत्साहात जिम जॉइन केल्यामुळे सगळ्या…

  • श्रीखंड यहीं बनाएँगे

    वास्तविक गोड पदार्थांमध्ये मला सर्वांत जास्त कुठला पदार्थ आवडतो, हा एक यक्षप्रश्न आहे. म्हणजे मला गूळतूप ते रसमलाई, बर्फी ते मोदक (काजू मोदक वगळून! तो प्रकार माझ्या डोक्यात जातो.), फणसपोळी ते पुरणपोळी सर्व तितकेच प्रिय आहेत. त्यामुळे ह्या पदार्थाबद्दल लिहिताना त्याला नेमकं काय…

  • उकडीच्या करंज्या

    उकडीच्या करंज्या नामक पदार्थाची भारतीय, विशेषतः कोकणस्थ मराठी, पाकविश्वात भर टाकल्याचा मला भयंकर आनंद झाला आहे. त्यात भरीस भर म्हणून चाकाच्या पुनर्शोधाचं पातक कपाळी नाही. पर्यायाने नाविन्य ह्या निकषावर पैकीच्या पैकी गुण. दीडेक वर्षांपूर्वी एका मंगलसमयी आपल्या पाककलाविषयक…

  • साबुदाण्याची खिचडी

    परवा हापिसात नशिबाला पुजलेली इडली गिळताना नेमकी एका मराठमोळ्या सुबक ठेंगणीशी गाठ पडली. 'काय, कसं काय'वर न भागता तिचा पाकशाळेत स्वहस्ते रांधलेला डबाही दृष्टीस पडला. अंमळ असूयेनंच मी कसंबसं म्हटलं, "वा, साबुदाण्याची खिचडी कशी काय?" 'मला साबुदाणा भिजवायचं वेळच्या वेळी आठवतं, जमतं.…

  • वांग्याचे भरीत

    आईची आठवण या चित्रपटीय गळेकाढू प्रकरणातला माझ्याबाबतीत सर्वांत खरा आणि महत्त्वाचा भाग असेल, तर तो इतकाच की घरी मिळणारं आयतं, चवीपरीचं आणि पारंपरिक अन्न घराबाहेर राहिल्यावर मिळेनासं झालं. बाहेरचं खाणं ही माझ्यातल्या मुंबैकरणीला अगदी सवयीची नि आवडीची गोष्ट खरीच. पण किती झालं तरी…

  • भाजणीच्या पोळ्या

    पोळपाट-लाटणं हे स्वैपाघरातलं एक अत्यावश्यक आयुध मानलं जातं. पण सुदैवानं अ आणि मी दोघींनाही पोळ्या नावाच्या प्रकारात यत्किंचितही इंट्रेष्ट नव्हता - नाही. पोळी तव्यावर उलटली की त्यातल्या वाफेचा जो एक विशिष्ट वास येतो, त्यानं मला भरल्या पोटी मळमळूही शकतं - इतकी माझी नावड टोकाची…

  • ...ऊर्फ सुगरणीचा सल्ला!

    काही कबुल्या: १) खाण्यापिण्यावर लिहिणं ही काही माझी वरिजनल आयडिया नव्हे. अशीच भटकंती करताना काही झकास फूड ब्लॉग्स मिळाले. अशीही मला 'रुचिरा' टाईपची पुस्तकं वाचायचा छंद आहेच. त्याच चालीवर हे ब्लॉग्स मनापासून वाचले. 'कुठलीही खाद्यसंस्कृती सर्वश्रेष्ठ नसते. एका खाद्यसंस्कृतीवर…