मुख्य मजकुराकडे जा
मेघना भुस्कुटे

काहीबाही

८० नोंदी

  • आजीची गोष्ट ०५

    (भाग ०४) तिला शिक्षणाची हौस होती, म्हणजे किती होती! तिच्या लहानपणी तिला फारसं शाळेत जाता आलं नाही. काळही वेगळा, मुलींना शिकवण्याला फारसं महत्त्वच नव्हतं. ती ज्या खेड्यात जन्मली तिथे शाळाही नव्हती तेव्हा चौथीच्या पुढे. शिवाय घरची गरिबी. सकाळी कामं करून शाळेत जायची, तर जाताना काही…

  • · सांगोवांगी

    आजीची गोष्ट ०४

    (भाग ०३) ०४ ही गोष्ट माझ्या आजीची खरी. पण ती तिच्या एकटीची अर्थातच नव्हे. तिच्याकडे थोडं दुरून बघताना मला बाकीच्या सगळ्या गोष्टीही दिसत राहतात. त्या गोष्टी स्वतंत्र असल्या, तरी सुट्ट्या नव्हेत. त्या आजीच्या गोष्टीशी जोडलेल्या आहेत. किंबहुना तिनंच त्या निरनिराळ्या प्रकारे जोडून…

  • · सांगोवांगी

    आजीची गोष्ट ०३

    (भाग ०२) ०३ तिला शिक्षणाची फार हौस. मुलाबाळांना आणि मग नातवंडांना चांगल्या शाळांतून शिकता यावं म्हणून तिनं पुढे नाना खटपटी केल्या. पण तिला स्वतःला मात्र चौथीपेक्षा जास्त शिकायला मिळालं नाही. घरातली सगळी कामं करून, आजीच्या सगळ्या अटी पुरतावून मगच शाळेत जाता यायचं. पण चौथी पास…

  • · सांगोवांगी

    आजीची गोष्ट ०२

    (भाग ०१) ०२ आजीचं लग्न आयनीतच झालं. घरापुढल्या मांडवात. लग्नाला किती लोक असतील? तिच्या मोठ्या दोन बहिणींची लग्नं तोवर झालीच असतील. पण मोठी सिंधू – तिच्या घरची तशी परवडच होती. त्याबद्दल पुढे कधीतरी. ताईचं घरचं बरं असणार. ती आणि तिचा नवरा असे आले असतील का लग्नाला? बहुधा असतील.…

  • · सांगोवांगी

    आजीची गोष्ट ०१

    आपल्याला आपले आईवडील आणि इतर नातेवाईक कुटुंबातल्या जुन्या आठवणी सांगतात. त्यात अर्थातच त्यांचे स्वतःचे बरेवाईट पूर्वग्रह, आवडीनिवडी, काही प्रमाणात हितसंबंधही असतात. त्यामुळे त्या आठवणींच्या काचेतून आपल्याला दिसणार्‍या गोष्टी पूर्णतः नितळ नव्हेत हे खरंच. पण आपणही या चित्राचे…

  • मेहंदी से जला के उंगलीयाँ...

    आमच्या इमारतीबाहेर कुंपणबिंपण होण्याच्या पूर्वी तिथे मेंदीची झुडपं होती. त्याची पानं वाटून एखाद्दोनदा हाताला बांधण्याचा उपद्व्याप केलेला आठवतो. पण आमची खरी भिस्त मेंदीच्या तयार कोनांवरच असायची. ते कोन चांगले आहेत ना, असं दुकानदाराला चारचारदा विचारून मग आणायचे. नि तरी तो अडकायला…

  • राहत्या शहराचे लागेबांधे ०७

    ग्लोबल कंटाळ्याचे ढग डोक्यावर जमा होत असताना कानात गुंड्या खुपसून शहरातल्या रस्त्यांवरून चालत सुटावं. काही लावू नये गुंड्यांवर, पण असू द्याव्यात त्या कानात. लोक आपल्याला तिरशिंगराव समजून दूर राहतात. पहिली साताठ मिनिटं आपण आपल्या डोक्यात तडमडत राहतो. मग मात्र कुरकुरलेले आपण…

  • त्रांगडं

    माझा एक प्रियकर म्हणायचा, "माणसांच्या आजूबाजूला असण्यातून ताकद शोषून घेतो मी. एकटा असलो, तर कंटाळून-विझून जातो." मला तेव्हा अजब आणि आकर्षक वाटलं होतं हे, इतकी स्वतःच्या माणूसघाणेपणाविषयी खातरी होती. आता काही वर्षांनंतर वाटतं, अर्थात, दुसरा काय रस्ता असतो आपल्यासारख्या नास्तिक…

  • या मौनाची जात निराळी

    या मौनाची जात निराळी

    उंबऱ्यापाशी अडते पाऊल, त्या प्रहराची आण निराळी

    या मौनाची जात निराळी.

    कडू बोलणे पात दुधारी, पण डोळ्यांची साक्ष वेगळी

    या मौनाची जात निराळी.

    …

  • कासवकाळ

    अधूनमधून माझ्यातलं कासव डोकं वर काढतं. एकदा त्यानं डोकं वर काढलं की मला गुपचूप पाय पोटाशी घेऊन मान आक्रसून घेऊन कुठल्यातरी अंधाऱ्या कोपऱ्यात दडून बसण्याची अनावर हुक्की येते. खूप इंट्रेस्टिंग कामं, माणसं, कार्यक्रम, मजेच्या संधी, आमंत्रणं असतात. पण कासव पुन्हा तळाकडे सूर मारेस्तो…