मुख्य मजकुराकडे जा
मेघना भुस्कुटे

गिचमीड

२८ मे, २०२५

शेवटचा बदल २ जून, २०२५

वाटतं,

फार गिचमीड नकोच पानावर.

नुसतं वावरावं तुझ्या अवतीभवती.

संथ लगबगीनं.

तुझ्या तंद्रीदार प्रश्नांना अटकर उत्तरं पुरवावीत,

नेमक्या जागी स्वल्पविराम रेखावा.

पडदे झुळझुळते राखावेत,

गॅलरीत एखादा नाजूकसा हिरवागार वेल,

बकुळीची चार फुलं टेबलापाशी.

हवेत गुणगुण.

बस.

वाचता वाचता थबकून,

हुंकार उमटावा,

नकळत.

मग काही म्हणायला नकोच वाटावं.

शब्द वरवरचे, फोलपटांसारखे, निःसत्त्व…

एकेकदा अश्लीलही.

काही म्हणायला नकोच वाटतं बघ.

मेघना भुस्कुटे

कविता

मूळ Blogspot पृष्ठ: meghanabhuskute.blogspot.com/2025/05/blog-post.html