मुख्य मजकुराकडे जा
मेघना भुस्कुटे

बुजरी गाणी ०८

४ सप्टेंबर, २०२३

हे गाणं दिसायला चार गाण्यांहून वेगळं नाही. प्रियकर आणि प्रेयसी. फुलं. बागा. आवेग. पडद्यावर न दाखवता सुचवलेली चुंबनं. प्रणयाची पहिली रात्र. इत्यादी. पण तरीही ते डोक्यात रुतून का बसलं आहे, याचा विचार केला तर सगळ्यांत आधी आशाचं नाव समोर आलं. ऐंशी सालातला हा सिनेमा. त्या दशकात तिच्या आवाजाचा पोत कसा आहे, ते तिची त्याच दिवसांमधली एकाचढ एक गाणी पाहिली तरी कळेल. पण या गाण्यात – या गाण्यात तिचा आवाज एखाद्या खळाळत्या झर्‍यासारखा किलबिलत, खळाळत, मोकळेपणी वाहिला आहे. त्यातल्या ताजेपणानं चकित व्हायला होतं. दुसरं कारण म्हणजे शब्द. चार सरळसोट प्रणयी गाण्यांसारखे हे शब्द नव्हेत. दीवाना, इश्क, जुनून, प्यारमोहोब्बत इत्यादी ठरीव ठोकळ्यांची सवय असलेली आमची पिढी. त्या पार्श्वभूमीवर कानी आलेले या गाण्याचे शब्द त्यांच्या वेगळेपणाची दखल घ्यायला लावतात.

ही सगळी स्वप्नं सत्यात उतरतील, तू फक्त हो म्हण – असे ते शब्द. तेही ठीक. तिचं त्याला दिलेलं उत्तर मात्र निराळं आहे. ‘मोहोब्बतों में दोनों का एकही मतलब’! म्हणजे स्वप्न आणि सत्य यांचा अर्थ एकच आहे? की हो आणि नाही यांचा अर्थ एकच आहे?! दोन्ही अर्थ लागू पडतातच की. असं वाटून आपण चकित होऊन कवी कोण आहे बरं, असा विचार करू लागतो न लागतो, तोच ‘अदा से ना कहो या मुस्कुरा के हाँ कह दो’ असं स्पष्टीकरण येतं. म्हणजे नखरेलपणे दिलेला नकार नि हसून दिलेला होकार एकच, प्रेम असलं पाहिजे फक्त? वा! काय खेळ आहे शब्दांचा! पण - पण - पण हे ‘No is a complete sentence.’ हे पुरुषांना बजावावं लागण्याआधीच्याच काळात परवडू शकलं असणार, असंही वाटतं नि कवीबद्दल आणखीनच उत्सुकता वाटते. शोधल्यावर शब्द इतके का वेधक वाटावेत त्याचं उत्तर स्वयंस्पष्ट असल्यासारखा जबाब – साहिर. आश्चर्य समाप्त!

या शब्दांचं आणखीही एक वैशिष्ट्य आहे. ‘स्त्रीला शृंगारात अ‍ॅक्टिव रोल असता कामा नये’ या हिंदी सिनेमाच्या नियमानुसार मधुचंद्राच्या रात्री डोळ्यांत मेलेल्या माशासारखे भाव घेऊन बसलेली निर्विकार पुतळा नायिका गाण्यात हजेरी लावून जाते खरी. पण शब्द मात्र या डरपोकपणाला न जुमानणारे आहेत. ‘तुम्हारे बाहों के झूले में झूलने के लिए, मचल मचल के मेरे अंग गुनगुनाये हैं’, किंवा ‘तुम अपने हाथ से सरकाओगे मेरा आंचल, अजीब आग मेरे तन बदन में देहकेगी’, किंवा ‘मैं सुबह तुमको जगाउंगी लब पे लब रख कर’. नक्की काय वाटतंय, वाटेल, याबद्दल कुठलाही संदेह नाही! गाण्यातला फक्त प्रियकरच शृंगारासाठी आतुर झालाय आणि प्रेयसी हिप्पोगिरी करून लाडिक, लटकं नाही म्हणतेय – या सरधोपटपणाशी पूर्णतः फटकून असलेला आतुरतेचा स्पष्ट, थेट उच्चार.

घाई नसलेली, संथ, सुरेल सुरावट आणि दर कडव्यात तिसर्‍या ओळीला बदलून चकित करणारा टेम्पो. सिनेमा कितीही बटबटीत असला, साथीला महेंद्र कपूरचा आवाज असला, प्रियकराच्या भूमिकेतला नट कितीही साबणवडीसदृश असला – तरीही हे गाणं लक्ष्यात राहतं.

हज़ार ख्वाब हक़ीक़त का रूप ले लेंगे

मगर ये शर्त है तुम मुस्कुरा के हाँ कह दो

मुहबतो में है दोनों का एक ही मतलब

अदा से ना कहो या मुस्कुरा के हाँ कह दो

हज़ार ख्वाब हक़ीक़त का रूप ले लेंगे

हज़ार ख्वाब बहारों के और सितारों के

तुम्हारे साथ मेरी ज़िंदगी में आये है

तुम्हारी बाहों के झूले में झूलने के लिए

मचल मचल के मेरे अंग गुनगुनाये है

ये सारे शौक सारे शौक

ये सारे शौक सदाकतका रूप ले लेंगे

मगर ये शर्त है तुम मुस्कुरा के हाँ कह दो

हज़ार ख्वाब हक़ीक़त का रूप ले लेंगे

भरेगी मांग तुम्हारी वो दिन भी क्या होगा

सजेगी सेज हवाओं की साँस मेहकेगी

तुम अपने हाथ से सरकाओगे मेरा आंचल

अजीब आग मेरे तन बदन में देहकेगी

ये सारे शौक सारे शौक

ये सारे शौक सदाकतका रूप ले लेंगे

मगर ये शर्त है तुम मुस्कुरा के हाँ कह दो

हज़ार ख्वाब हक़ीक़त का रूप ले लेंगे

में अपनी जुल्फों के साये बिछाऊँगी तुमपर

में तुमपे अपनी जवाँ धड़कनें लुटाऊंगा

में सुबह तुमको जगाउंगी लब पे लब रख कर

में तुमको भींचके कुछ और पास लाउंगा

ये सारे शौक सारे शौक

ये सारे शौक सदाकतका रूप ले लेंगे

मगर ये शर्त है तुम मुस्कुरा के हाँ कह दो

हज़ार ख्वाब हक़ीक़त का रूप ले लेंगे

(गाण्याचे शब्द नेटवरून उचललेले आहेत, प्रमाणलेखनाची चूकभूल माफ असावी.)

मेघना भुस्कुटे

सिनेमा

मूळ Blogspot पृष्ठ: meghanabhuskute.blogspot.com/2023/09/blog-post_63.html