मुख्य मजकुराकडे जा
मेघना भुस्कुटे

बुजरी गाणी ०५

६ डिसेंबर, २०२२

काही गाणी किंचित बुजरी असतात. भेंड्या खेळताना म्हणा, टीव्हीवर सतत वाजणार्‍या हिट गाण्यांच्या कार्यक्रमात म्हणा, लोकप्रिय कलावंतांच्या सर्वोत्तम गाण्यांच्या याद्यांत म्हणा.. ती सहसा दिसत नाहीत. त्यांच्यात काहीतरी असं असतं, ज्यामुळे ती कधीच हमरस्त्यावर येत नाहीत. गजबजलेल्या रस्त्यावरून एखादं वळण घेतल्यावर समोर वडाचा विस्तीर्ण शांत गारेगार पार अवचित सामोरा यावा आणि अविश्वासानं आपण दीर्घ श्वास घेऊन थबकावं, तसं काहीतरी करण्याची अद्भुत जादू त्यांच्यापाशी असते.

हे गाणं त्यांपैकी एक.

आडवंतिडवं आसुरी खाल्ल्यामुळे दुपारी डोळ्यावर आलेली झापड जाऊन जाग यायला संध्याकाळ झाली की कसं वाटतं? तसं काहीतरी हे गाणं बघताना-ऐकताना वाटतं. ‘गुलाल’ पाहिला नसेल तर गाणं बघताना काय चाललंय त्याचा अर्थबोध होत नाही. पण त्या प्रतिमा आणि सूर मनावर काळीकुट्ट सावली पाडत जातात.

गाण्याच्या पहिल्यावहिल्या ओळींवरच घडलेला खून. शहर आणि गाव यांच्या सीमेवर अर्धवट विकासाच्या अभद्र खुणा लेऊन बसलेलं शहर. अर्धवट उजळणार्‍या पहाटेच्या वेळी, हळूहळू दृगोच्चर होऊन अंगावर काटा उभा करणारं, वेशीवर लटकवून दिलेलं प्रेत. त्या प्रेताकडे भेदरत भेदरत वळून बघणारी आणि पुन्हा निमूट कचरा चिवडू लागलेली म्हातारी. उघडीनागडी पोरं एकमेकांना उत्साहानं दाखवत असलेला प्रेताचा नजारा…

…सब ओरो गुलाल पूत गायो विपदा छायी रे

जिस रात गगन से खून की बारिश आयी रे…

एका दृश्यातून सावरता सावरता पुढचं अधिकच खचवून टाकणारं दृश्य अवतरतं. बांधल्या हातांनी आणि उघड्या डोळ्यांनी नजरेला धगधगती नजर देत गोळी खाऊन मरतं कुणी. रक्तानं न्हालेलं प्रेत पोलीस उचलून नेत असताना एखादा पत्रकार निर्विकार नजरेनं फोनवर बोलत टिपून घेतो काहीतरी. कुणी एक वृद्ध मुलाच्या मरणाची बातमी ऐकून बसल्या जागी मरण पावतो. जळणार्‍या चिता आणि त्यांना सलामी देण्यासाठी झाडल्या जाणार्‍या फैरी. उखीरवाखीर माळावर काहीतरी हुंगत फिरणारं एखादं मरतुकडं कुत्रं. थोबाडाला गुलाल फासून तारवटल्या-पिसाळलेल्या डोळ्यांनी घोषणा देणाऱ्या चेहऱ्यांच्या झुंडी…

सगळ्या प्रतिमांना पिवळसर वाळूचा, पण अजिबात सोनेरी वा सेपिया न भासणारा, मातकट रंग तरी आहे किंवा रक्ताचा लालबुंद रंग तरी.

सुनसान गली के नुक्कड पे जो कोई कुत्ता चीख चीख कर रोता है

जब लैंप पोस्ट की गंदली पिल्ली घूप रौशनी में कुछ कुछ सा होता है

जब कोई साया खुद को थोड़ा बचा बचा कर गम सायो में खोता है

जब पुल के खंभों को गाडी का गरम उजाला धीमे धीमे धोता है…

या शब्दांमध्ये नुसती चित्रमयता नाही, चित्र, ध्वनी, रंग, आणि गंध मिळून एक पूर्ण माहौल रचण्याची ताकद आहे. कुठूनतरी कुत्र्याचं भेसूर विव्हळणं ऐकू आल्याचा भास होतो, उदासवाण्या पिवळसर उजेडात निपचीत पडून राहिलेली रात्र दिसते, अर्धवट अंधार-उजेडाच्या सीमेवर भिंतीपाशी घसपटत-सरपटत-दबकत कुणीतरी निसटून गेल्याचा भास होतो..

हवेत काहीही अमानवी नसताही मानेवरचे केस उभे राहतात जणू.

पियूष मिश्रा आणि स्वानंद किरकिरे हे स्वतंत्रपणेही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असलेले असे आवाज. ते दोन आवाज या गाण्यात कोरस म्हणून एकवटून येतात, आणि पोस्ट्ट्रूथ तिसर्‍या जगातल्या लोकशाही-राजेशाही-भांडवलशाहीचा नंगा नाच चितारतात. डीमेंटरच्या किससारखं सगळं भकास भेसूर रिकामं वाटायला लागतं. अर्थ कळो वा न कळो.

~

व्हिडिओ

ए एक वक़्त की बात बताये एक वक़्त की

जब शहर हमारा सो गयो थो वो राज गजब की

हे चहु ओर सब ओर दिशा से लाली छाई रे

जुगनी नाचे चूनर ओढ़े खून नहायी रे

सब ओरो गुलाल पूत गायो सब ओरो में

हे सब ओरो गुलाल पूत गायो विपदा छायी रे

जिस रात गगन से खून की बारिश आयी रे

जिस रात शहर में खून की बारिश आयी रे

सराबोर हो गया शहर और सराबोर हो गयी धरा

सराबोर हो गयो रे जत्था इन्सानो का बड़ा बड़ा

सभी जगत यह पूछे था जब इतना सब कुछ हो रियो थो

तो शहर हमारा काहे भाईसाब आँख मूड के सो रियो थो

तो शेहेर यह बोलियो नींद गजब की ऐसी आयी रे

जिस रात गगन से खून की बारिश आयी रे

सन्नाटा विराना ख़ामोशी अन्जानी

ज़िन्दगी लेती है करवटे तूफानी

घिरते है साये घनेरे से

रूखे बालों को बिखेरे से

बढ़ते है अँधेरे पिशाचों से

काँपे है जी उनके नाचों से

कहीं पे वो जूतों की ख़तख़त है

कहीं पे अलावो की चटपट है

कहीं पे है झींगुर की आवाज़ें

कहीं पे वो नलके की टप टप है

कहीं पे वो काली सी खिड़की है

कहीं वो अँधेरी सी चिमनी है

कहीं हिलते पेड़ों का जत्था है

कहीं कुछ मुंडेरों पे रक्खा है

रे रे रे रे रे रे रे

हूँ हूँ हूँ हूँ

सुनसान गली के नुक्कड पे जो कोई कुत्ता चीख चीख कर रोता है

जब लैंप पोस्ट की गंदली पिल्ली घूप रौशनी में कुछ कुछ सा होता है

जब कोई साया खुद को थोड़ा बचा बचा कर गम सायो में खोता है

जब पुल के खंभों को गाडी का गरम उजाला धीमे धीमे धोता है

तब शहर हमारा सोता है

तब शहर हमारा सोता है

हो ओ ओ हो ओ

जब शहर हमारा सोता है

तो मालूम तुमको हाँ क्या क्या होता है

इधर जागती है लाशें ज़िंदा हो मुर्दा उधर ज़िन्दगी खोता है

इधर चीखती है हौआ खैराती उस अस्पताल में बिखरी सी

आँख में उसके अगले ही पल गरम मांस का नरम लोथड़ा होता है

इधर उठी हर तकरारें जिस्मो के झटपट लेन देन में ऊंची सी

उधर घाव से रिस्ते फूंको दूर गुज़रती आखें देखे रूखी सी

लेकिन उसको लेके रंगबिरंगे मेलों में गुंजाईश होती है

नशे में डूबे सेहन से खूंखार चुटकुलों की पैदाइश होती है

अध नंगे जिस्मों की देखो लिपी पुट्ठी से लगी नुमाइश होती है

लार टपकती चेहरों को कुछ शैतानी करने की ख्वाहिश होती है

वो पूछे है हैरान होकर

ऐसा सब कुछ होता है कब

वो बतला तो उनको

ऐसा तब तब तब तब होता है

जब शहर हमारा सोता है

जब शहर हमारा सोता है

~

नुक्ते आणि चांदबिंदी टंकायकरता कळपाट बदलण्याचा कंटाळा केल्यामुळे आणि हिंदी प्रमाणलेखनाचं अज्ञान असल्यामुळे चूक-भूल-देणे-घेणे.

मेघना भुस्कुटे

सिनेमा

मूळ Blogspot पृष्ठ: meghanabhuskute.blogspot.com/2022/12/blog-post_6.html