मुख्य मजकुराकडे जा
मेघना भुस्कुटे

तुझिया ओठांवरचा मोहर मम ओठांवर गळला ग...

२७ एप्रिल, २००७

शेवटचा बदल ४ जानेवारी, २०१४

शिल्पा आणि रिचर्ड गिअर यांच्यावरून आपल्याकडे जे रामायण चाललंय, त्यावर काही प्रतिक्रिया व्यक्त करणं म्हणजे येडेपणाच आहे.

पण विंदांच्या खास शैलीतली ही कविता मात्र आठवतेय. या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर ती आठवताना काही औरच मजा येतेय!

विंदा म्हणतात -

तुझिया ओठांवरचा मोहर मम ओठांवर गळला ग,

अन्‌ आत्म्याच्या देव्हाऱ्यातुन गंध मधुर दरवळला ग

आज मधाची लाट मनावर उसळत उसळत फुटली ग,

आज सखे मज नकळत अलगज गाठ जिवाची सुटली ग

आगांतुक ही आज दिवाळी उंबरठ्यावर बसली ग,

आज घराची फुटकी कौले अंधाराला हसली ग

चार दिशांच्या चार पाकळ्या चार दिशांना वळल्या ग,

विश्वफुलातिल पिवळे केंसर, खुणा तयाच्या कळल्या ग…

- विंदा करंदीकर

’मृद्गंध’

मेघना भुस्कुटे

कविता

मूळ Blogspot पृष्ठ: meghanabhuskute.blogspot.com/2007/04/blog-post_27.html